महाराष्ट्र

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर अ‍ॅम्ब्युलसने मुंबईकडे रवाना

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना करण्यात आले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | औरंगाबाद : एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना करण्यात आले आहे. एअर अ‍ॅम्ब्युलसने त्यांना मुंबईकडे रवाना केले आहे.

आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी त्रास जाणवू लागल्याने औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालायात उपचारार्थ दाखल केले होते. परंतु, आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलसने मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे कार्यकर्त्याची टेन्शन वाढले आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा हात सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. परंतु,पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना स्थान न मिळाल्याने मागील अनेक दिवसांपासून ते नाराज दिसत होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे जाहीरही केली होती. यात भर म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुंबई व ठाण्यातील एकूण नऊ विभागप्रमुखांच्या यादीतही संजय शिरसाट यांचे नाव नव्हते. यामुळे शिरसाटांच्या नाराजीत आणखी भर पडली होती.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय