"बाबरीचाच जर विषय असेल आणि कुणी म्हणत असेल त्यावेळी शिवसेना कुठं होती तर त्यांच्याच पक्षातील सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारा? आणि त्याकाळातला सीबीआयचा अहवाल तपासा, गुप्तचर खात्याचा अहवाल तपासा त्यानंतर त्यांना कळेल शिवसेना कुठं होती." असं म्हणत सध्याचे प्रश्न बदललेले आहेत, आता बाबरीचा मुद्दा काढून फायदा नाही कारण सध्या राम मंदीर उभं राहत आहे. ते आता मुळ प्रश्नापासून लोकांना दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर लावला आहे.
1 मे ला राज ठाकरेंनी Raj Thackeray ( Raj Thackeray) भोंग्यावरुन औरंगाबादच्या सभेत केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "हा कायद्याचा विषय आहे, हे प्रश्न कायद्यानेच सुटतील, कोर्ट, हायकोर्ट, पोलिस व्यवस्था यासंबंधित निर्णय घेतील. तुम्हाला आता काही काम नसल्यामुळे स्वत:च्या राजकीय हितासाठी तुम्ही हे विषय काढत आहात आणि देशातील वातावरण खराब करत आहात." असा टोला त्यांनी लावला आहे.
सध्या देशभरात अनेक प्रश्न आहेत. महागाई दिवसेंदिव वाढत आहे, चीन घुसखोरी करत आहे. या प्रश्नावर लोकांचे लक्ष लागू नये म्हणून भाजपाकडून असे काम केले जात आहेत. लोकांच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी माध्यमांना बोलताना केला.