sanjay raut | sunil raut | eknath shinde team lokshahi
महाराष्ट्र

Sanjay Raut: आसामहून 'बॉड्या' आणणार म्हणणाऱ्या संजय राऊतांचे आणखी एक झोंबणारं ट्विट

'जहालत... एक किसम की मौत है और जाहील लोग चलती फिरती लाशे है'. साहजिकच संजय राऊत यांचे हे ट्विट बंडखोर आमदारांना झोंबणारे आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गोटातील कोणता आमदार यावर प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांसंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. गुवाहाटीला ( Guwahati) गेलेले आता जिवंत प्रेतं आहेत आणि ही जिवंत प्रेतं आता मुंबईत येतील, तेव्हा त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन एकच गदारोळ सुरु झाला होता. त्यातच आता संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं असून ते चर्चेत आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळीच एक ट्विट करून बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा डिवचले आहे. संजय राऊत यांनी या आमदारांना 'अडाणी' म्हणून हिणवले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'जहालत... एक किसम की मौत है और जाहील लोग चलती फिरती लाशे है'. साहजिकच संजय राऊत यांचे हे ट्विट बंडखोर आमदारांना झोंबणारे आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गोटातील कोणता आमदार यावर प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वादग्रस्त विधानांचं सत्र सुरूच आहे. आता शिवसेनेतल्या बंडखोरांवर तीव्र टीका केली जात आहे. काल सामनामधूनही बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख एकदास शिंदे, तर बंडखोर आमदारांचा उल्लेख नाच्या असा करण्यात आला होता.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव