थोडक्यात
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर आता संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्ही वारंवार सांगत होतो. रश्मी शुक्ला यांच्या नेमणूकीबाबत वाद आहे. अडीच वर्षापूर्वी त्यांची नेमणूक त्याच पद्धतीने झाली आता ही होईल. भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील. बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणूका त्या आपल्याला सहन करावे लागतील.
यासोबतच ते म्हणाले की, हे बहुमत लोकशाहीमार्गाने आलेलं नाही. हे बहुमत असंख्य घोटाळे, पैशाचा वापर, यंत्रणांचा वापर करुन आल्यामुळे येणाऱ्या सरकारवर कोणतही नियंत्रण नसेल. त्याच्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल, अन्य कुणाच्या नेमणूका होईल. असं संजय राऊत म्हणाले.