शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू केली आहे. अशातच आज संजय राऊत यांनी ट्वीट करत, नएसईएलमध्ये 5600 कोटींचा घोटाळ्या प्रकरणी सोमय्यांनी चौकशीची मागणी केली होती. मोतीलाल ओस्वाल या कंपनीच्या शिपयाच्या घरी जात सोमय्या यांनी तमाशा केला. या प्रकरणाची ईडीनेदेखील चौकशी केली. मात्र, त्यानंतर 2018-19 मध्ये किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओस्वाल कंपनीकडून लाखोंची देणगी मिळाली असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
मंगळवारीदेखील संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधताना मेट्रो डेअरी घोटाळा प्रकरणी सोमय्यांवर आरोप केले होते. कोलकातामधील मेट्रो डेअरी घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयने चौकशी केली आहे. मात्र, या मेट्रो डेअरीने सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंची देणगी दिली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.