पुण्यामध्ये शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान आहे. या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पुण्यातील लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली असून भगवा आणि निळा एकत्र आल्याने महाराष्ट्राची ताकद दिसेल. बाबासाहेबांपासून जगाने प्रेरणा घेतली. पुणे महापालिकेवर भगवा फडकणार. लढणाऱ्या शिवसैनिकालाच जागा मिळणार. पुणे (pune) शहराला दिशा देण्याचं काम करायचं आहे. ज्यांनी अहंकार सोडला तो विजयी झाला. आपण टिकून राहिलो त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले आहे असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.
काही होईल कुणामध्ये महाविकास आघाडीचं काय होईल. हे आपण दाखवू शकतो. पण जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी सामना करून आपण या पुणे महापालिकेवर भगवा झेंडा फडकावण्याची जिद्द आपण ठेवली पाहीजे. मागील वेळेचे आकडे पाहिले असता या भागातून आपल्यालाच जास्त जागा मिळाल्या आहेत. अजून जागा मिळतील कारण आपण पुणे जिल्ह्यात आपण जास्त झंझावत निर्माण केला होता. शिवसंपर्क पुण्यात झालं असून आपण खूप मोठा मेळावा घेतला. त्यामुळे पुण्यात एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे.
लढणाऱ्या शिवसैनिकांना त्या जागा मिळणार
जगभरात आज तुम्ही कुठेही गेलात तरी लढणाऱ्यांना प्रेरणा द्यायचं काम दोन लोकांनी केलं. पहिले म्हणजे या देशाचे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. गौतम बुद्धांचा एकच संदेश आपण अहंकार सोडून लक्षात ठेवला पाहीजे. ज्याने अहंकार सोडला तो विजयी झाला. मगाशी आपण उल्लेख की, ४२ जागांचं काय होणार?, ४२ जागा आहेत की चांगली गोष्ट आहे. परंतु लढणाऱ्या शिवसैनिकांना त्या जागा मिळणार आहे, असं राऊत म्हणाले.
पुणे शहराला एक दिशा देण्याचं काम केलं पाहीजे
महिला आघाडी आणि तरूण मुलं मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. जुन्या, नव्या आणि तरूण शिवसैनिकांना आपण एकत्र केलं पाहीजे. आपल्याला पुणे शहराला एक दिशा देण्याचं काम केलं पाहीजे. शिवसेनेचा नगरसेवक काय करू शकतो. आपले मोजके नगरसेवक आहेत. प्रत्येकाचं काम हे आदर्श काम आहे. नगरसेवक म्हणून काय काम कराल, ही जी बाळा साहेबांची संकल्पना होती. हे आपले नगरसेवक पुण्यात चांगल्याप्रकारे करण्याचं काम करत आहेत, असं राऊत म्हणाले