महाराष्ट्र

Sanjay Raut : राऊतांविरोधात साक्ष देणाऱ्या स्वप्ना पाटकरांना जीवे मारण्याची धमकी!

शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथीत १,०३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात ईडीनं काल (गुरुवार) चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पण राऊत या चौकशीला हजर राहिले नव्हते.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथीत १,०३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात ईडीनं काल (गुरुवार) चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पण राऊत या चौकशीला हजर राहिले नव्हते. यापूर्वी दोन वेळा संजय राऊत यांची या प्रकरणी ईडीनं चौकशी केली आहे. याचदरम्यान पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर जबाब नोंदवलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. पाटकर यांनी ईडीला ही माहिती दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील साक्ष मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी स्वप्ना पाटकर यांनी ईडी समोर जबाब नोंदवला आहे. पण स्वप्ना पाटकर यांनी ईडी आणि मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी आपल्याला दोन-तीन फोन नंबरवरुन बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घ्यावा किंवा बदलावा यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

ईडीनं त्यांच्या पत्राची दखल घेतली असून त्यांची ही तक्रार वाकोला पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्त तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनाही याची एक प्रत पाठवण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस याची चौकशी करत आहेत.

संजय राऊतांना ईडीनं का पाठवलं समन्स?

ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव