महाराष्ट्र

10 दिवसांत विरोधकांनी केली सरकारची दोनदा कोंडी, ‘या’ दोन निर्णयामुळे ओढवली नामुष्की

Published by : Lokshahi News

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे अधिवेशन विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. यात महत्वाची बाब म्हणजे गेल्या 10 दिवसांत विरोधकांनी दोन गंभीर प्रकरणांमध्ये सरकारची कोंडी केली. संजय राठोड राजीनामा प्रकरण आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली या दोन्ही प्रकरणात विरोधकांनी कोंडी केल्यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चर्चेत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अधिवेशनात या सर्व घटनाक्रमावर अनेक संशय व्यक्त करत सचिन वाझेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले.

विरोधकांनी या मुद्यावरुन अधिवेशनात सरकारला घेरलं असून ठाकरे सरकारने अखेर सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. "सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल," अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सचिन वाझे प्रकरणात नमते घ्यावे लागले.

संजय राठोड राजीनामा प्रकरण…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत होते. या सबंधित कॉल रेकॉर्डिंग व फोटोसही समोर आली होती. तसेच विरोधकांनी सुद्धा हे प्रकरण चांगलेचं उचलून धरले होते. या विरोधात राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलने केली. तसेच राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा इशाराचं दिला होते.

त्यामुळे अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी शिवसेना आमदार संजय राठोड यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी करत राज्यपालांना पाठवल्यानंतर त्यांनीही तातडीने मंजूर दिली. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संजय राठोड यांना पायउतार व्हावे लागले. तसेच सरकारवर नामुष्की ओढवली.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती