संजय देसाई, सांगली
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक पूल बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कृष्णाच्या पाणी पातळीत वाढ होऊन आयुर्वेद फुल या ठिकाणी पाण्याची पातळी 29.3 फुटांवर पोहोचली असून चांदोली धारणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुरपट्टयातल्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.