आदेश वाकळे, संगमनेर | संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे तिसरी लाटेचा धोका लक्षात घेता उपाययोजना म्हणून प्रशासनाने संगमनेर तालुक्यातील 27 गावे 5 ऑक्टोंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.
संगमनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे.आज शहरासह तालुक्याच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने तालुका आरोग्य व्यवस्थेची चिंता दुप्पट झाली आहे. एकीकडे वरीष्ठ पातळ्यांवरुन आदेशा मागून आदेशाची रिघ लागलेली असताना दुसरीकडे त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने तालुका पुन्हा एकदा कोविडच्या सावटाखाली आला आहे.
रुग्णवाढ गेली तीन दिवस खालावलेली होती.आज मात्र पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज शहरातील ११ जणांसह तालुक्यातील 155 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येने आता एकूण 33 हजार रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे दहा पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असलेले गावं लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. आता 27 गावे 5 ऑक्टोंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे..खळी, पिंप्री, लौकि, जाखुरी पानोडी,मणोली घुलेवाडी असे एकूण 27 गावे प्रशासनाने बंद केली आहे.