महाराष्ट्र

समृध्दी महामार्ग अपघाताप्रकरणी मोठी अपडेट; कारण आलं समोर

समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. यामुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अशातच, याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.

समृद्धी महामार्गावर खासगी बस डिव्हायडरवर आदळली आणि बसने पेट घेतला. त्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. काही प्रवाशांनी काचेची खिडकी तोडली आणि बाहेर पडले. या अपघातातून ड्रायव्हरसह 8 जण बचावले आहेत. याप्रकरणी बसचालक दानिश शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तपासात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमरावती फॉरेन्सिक लॅब (FSL)च्या अहवालातून समोर आले. चालक शेख दानिश हा दारूच्या नशेत होता. ३० टक्के शरीरात अल्काहोल आढळले, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती