महाराष्ट्र

समीर वानखेडे आणि शाहरुख खानमधील व्हॉटस अ‍ॅप चॅट समोर

आर्यन खान याच्या प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप आहे. अशात वानखेडेने शाहरुख खानसोबत केलेले व्हॉटस अ‍ॅप चॅट आता समोर आले आहे. समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसोबत हे व्हॉटस अ‍ॅप चॅट जोडले आहे.

शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातले संभाषण

शाहरुख म्हणाला की, घटना आर्यनच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी आपण हे केले आहे आता पुढील पिढीने पालन केले पाहिजे आणि ते भविष्यासाठी तयार करणे आपल्या हातात आहे. तुमच्या दयाळूपणाबद्दल आणि समर्थनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यावर वानखेडेंनी माझ्या शुभेच्छा, असे म्हंटले आहे.

शाहरुख पुढे म्हणाला, धन्यवाद. तू चांगला माणूस आहेस. आज मी विनंती करतो की त्याच्यावर दया करा. तुम्ही सांगाल तेव्हा मी वैयक्तिकरित्या यायला तयार आहे आणि मी तुम्हाला मिठीही मारेल. कृपया तुमच्या सोयीनुसार वेळ कळवा.

कृपया त्याला त्या तुरुंगात राहू देऊ नका. तो माणूस म्हणून कोलमडून पडेल. काही स्वार्थी लोकांमुळे त्याचा आत्मा नष्ट होईल. तुम्ही मला वचन दिले होते. माझ्या मुलाला अशा ठिकाणी ठेवणार नाही जिथे तो कोलमडलेला बाहेर येईल. आणि यात त्याचा काही दोष नाही. काही स्वार्थी लोक जे करत आहेत त्याला एक चांगला माणूस म्हणून तुम्ही साथ देऊ नका. मी तुम्हाला वचन देतो की मी काहीही करायला तयार आहे. त्यांना काहीही देण्यास तयार आहे. पण कृपया माझ्या मुलाला घरी पाठवा. तुम्हाला हे देखील माहित आहे की तुमच्या हृदय त्याच्यासाठी खूप कठोर झाले आहे. कृपा करून एक बाप म्हणून विनवणी करतो.

माझ्या स्वतःबद्दल तुम्ही मला दिलेले सर्व विचार आणि वैयक्तिक अंतर्दृष्टी यासाठी तुमचे आभार मानू शकत नाही. मी खात्री करून घेईन की तो असा कोणीतरी असेल ज्याचा तुम्हाला आणि मला दोघांना अभिमान आहे. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल, मी वचन देतो, चांगल्या मार्गाने, असे शाहरुखने म्हंटले आहे. तर, नक्की, काळजी करू नकोस, असे वानखेडेंनी यावर उत्तर दिले आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर 3 ऑक्टोबर 2021 रोजी गोव्याला जाणार्‍या कॉर्डेलिया क्रूझमधून ड्रग्ज जप्तीच्या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आरोपी न बनवण्याच्या बदल्यात 25 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे सीबीआयने वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. तथापि, वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दाखल याचिका दाखल केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का