महाराष्ट्र

Baba Siddique : सलमान खानच्या जीवाला धोका? बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगाचा हात असल्याचे समोर आले आहे.

Published by : shweta walge

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगाचा हात असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी याविषयीचा खुलासा केला आहे. या हत्येच्या तपासात बिश्नोई गँग असल्याचे समोर आले आहे. शूटर्सच्या जबाबानंतर पोलीस या निष्कर्षावर पोहचली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे, सलमान खान याच्यावर दहशत बसवणे हाच उद्देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. चार जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. पंजाबमध्ये एका जेलमध्ये असताना हे तिघं जणं एकमेकांच्या संपर्कात आले होते. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं मध्यप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे.

बाबा सिद्दीकी आणि सलमान खान हे अगदी घनिष्ठ मित्र आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येतून सलमान खान याला थेट संदेश देण्याचा प्रयत्न तर करण्यात आला नाही. त्याला घाबरवण्यासाठी हा प्रकार तर करण्यात आला नाही ना? यादृष्टीने पोलीस तपास करत आहे. हत्येनंतर सलमान खान उशीरा रात्री लीलावती रुग्णालयात पोहचला. त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. सलमान खान हा पूर्वीपासूनच बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. आता बाब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलीस सर्वच बाजूने तपास करत आहेत.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती