महाराष्ट्र

देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा

Published by : Lokshahi News

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मुख्य मंदिरातच संपन्न झाला. उद्या संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे मोजक्याच चाळीस वारकऱ्यांसह सकाळी साडेआठ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

दरम्यान जमावबंदीचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. एक पोलीस उपायुक्त एक सहाय्यक पोलीस आयुक्त चार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बारा अधिकारी आणि साठ कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त पालखी प्रस्थान सोहळ्यास लावला आहे.

मात्र वारकऱ्यांनी आणि भाविकांनी आपल्या घरी बसूनच तुकोबारायांची आणि माऊलींची पूजा करावी. कोणीही देहू गावात येऊन गर्दी करु नये असाही आवाहान पोलीस अधिकारी यांच्या वतीने करण्यात आलं आहे.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल