महाराष्ट्र

नागपूरच्या मालविकाने सायनाला नेहवालला केलं पराभूत; ऊर्जामंत्र्यांनी केला फोन

Published by : Lokshahi News

कल्पना नळसकर | इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन स्पर्धेत जगज्जेत्या सायना नेहवालला नागपूरची मालविका बनसोड हिने तिसऱ्या फेरीत चित करुन विक्रमी कामगिरी केली आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष फोन करून तिचे अभिनंदन केले.

मालविका तू केलेली कामगिरी तमाम नागपूकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. तुझे करावं तेवढे कौतूक कमीच आहे. तू अशीच उंच भरारी घेत यशाची शिखरे पादाक्रांत करत जा, मी सदैव तुझ्या पाठिशी आहे," असे गौरोद्वगार डॉ. राऊत यांनी यावेळी दिल्लीत आपल्या आईसोबत आलेल्या मालविकाशी बोलताना काढले. कस्तुरचंद पार्क येथील एका कार्यक्रमात मालविकाचा सत्कार केल्याची आठवण ही त्यांनी यावेळी काढली.

नागपूरसारख्या शहरातून मालविका हिने इंडिया ओपन 2022 मध्ये सहभाग घेत केलेली कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद आहे. नागपूर शहरातून मालविका सारखे खेळाडू उंच भरारी घेत आहेत. मालविकाने केलेल्या कामगिरीमुळे नागपूर शहराचे नाव अजून एकदा जागतिक पातळीवर उंचावले आहे. भविष्यात मालविका अशीच उत्तोमोत्तम कामगिरी करीत राहील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही विजय मिळवत राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. मालविकाला भविष्यात जागतिक पातळीवर खेळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे डॉ राऊत यांनी तिच्याशी बोलताना म्हटले.

या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत नागपूरची २० वर्षीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने सानियाला २१-१७, २१-१९ असे हरवले. हा सामना ३४ मिनिटे सुरू होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते. दिग्गज खेळाडूला पराभूत केल्यानंतर मालविकाचे सोशल मीडियावरून कौतुक होत आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती