Shirdi  Team Lokshahi
महाराष्ट्र

सात मेट्रिक टन रांगोळीतून शिर्डीत साकारली साई बाबांची प्रतिमा | Drone Video

रामनवमीनिम्मित शिर्डीत ही साई बाबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

Published by : Sudhir Kakde

कुणाल जमदाडे : शिर्डी | रांगोळीच्या माध्यमातून तब्बल एक एकर क्षेत्रावर साईबाबांची भव्य प्रतिमा रामनवमी निम्मित साकारण्यात आलीये. ही प्रतिमा यंदाच्या श्रीरामनवमी यात्रेचं आकर्षण ठरणार आहे. त्यासाठी देशाला रांगोळी पुरवणाऱ्या छोटा जयपूर येथून तब्बल सात मेट्रिक टन रांगोळी मागविण्यात आली होती. तर रांगोळी  साकार करण्यासाठी त्या जागेवर दोन एकर क्षेत्र गायीच्या शेणाने सारविण्यात आले.

मुंबईतील सत्तावीस रांगोळी कलाकारांचं पथक शिर्डीत दाखल झालं होतं. त्यांच्या मदतीसाठी विविध राज्यांतील सुमारे चारशे कलाकारांनी आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली होती. आज सायंकाळच्या सुमारास रांगोळी पूर्ण झाली. रांगोळीच्या माध्यमातून साईबाबांची प्रतिमा साकारलेलं ड्रोन कॅमेऱ्यातुन टिपलेलं विहंगम दृश्य सध्या सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारं ठरतंय.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news