महाराष्ट्र

सचिन वाझेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अ

Published by : Siddhi Naringrekar

सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे तसेच अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली असल्याचे वाझे यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी सांगितले की, मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचेही नाव दिले आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. असे देखिल वाझे यांनी म्हटले आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे म्हणाल्या की, वाझेंनी पत्र लिहिण्याचा वेळ इतकीच संशयास्पद आहे की तिथेच मला वाटते की, वेगळ्या काही स्पष्टीकरणाला जागा उरत नाही. वाझेंना काही लिहायचे होते तर त्यांनी ते इतके दिवस का लिहिलं नाही. वाझेंनी ते आताच का लिहावं जेव्हा अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर गंभीर आरोप केलेलं आहेत. वाझे हे कुणासाठी लिहित आहेत. वाझे स्वत:ला निर्दोष करण्यासाठी पत्र लिहित आहे? माझे अनिल देशमुखांवर आरोप करण्यासाठी पत्र लिहित आहेत? की वाझे सगळीकडून फडणवीसांवर हल्ले होत आहेत म्हणून फडणवीसांना वाचवण्यासाठी पत्र लिहितात.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. दुसरं असे की, वाझेंना लिहायचं असेल तर वाझे एखाद्या न्यायसंस्थेच्या प्राधिकृत व्यक्तीला त्या अधिकाऱ्याला का पत्र लिहित नाहीत. ते फडणवीसांना का लिहितात? या फडणवीसांवर सगळीकडून आरोप झालेलं आहेत. ये रिश्ता क्या कहलात है. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे