अभिजित हिरे , प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या बाहेर जिलेटीन कांड्या भेटण आणि त्या नंतर झालेले मनसुख हिरेन हत्या प्रकरणी हत्या प्रकरणी अटक असलेले मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भिवंडी तालुक्यातील एस एस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सचिन वाझे नक्की काय झालं ?
आरोपी सचिन वाझे हे सध्या तळोजा रुग्णालयात असून नुकताच न्यायालयात त्यांनी आपल्या व्याधी संदर्भात माहिती देऊन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली असता न्यायालयाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पंधरा दिवसांची मुभा दिली आहे. त्यानुसार ते उपचारासाठी त्यांना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील एस एस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सचिन वाझे यांच्या हृदयात ब्लॉकेज असून त्यावर एन्जोग्राफी व गरज पडल्यास एन्जोप्लास्टी करण्यात येणार आहे.या ठिकाणी रुग्णालया बाहेर स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा ,ठाणे नवी मुंबई व मुंबई येथील पोलीस बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहे .
मुकेश अंबानी प्रकरण
मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला आहे . या प्रकरणात त्याला अटक केल्या नंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती . कारागृहात वाझे यास हृदय विकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती . त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे.
सध्या सचिन वाझे यांच्यावर भिवंडीतील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत . परंतु या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ठाणे शहरात त्यांना नेण्यात का आले नाही ? की यामध्ये काही राजकारण आहे अशी चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.