रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचलेले आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये सकाळपासूनच लाईट गायब आहे. मात्र, याही परिस्थितीत जिवावर उदार होऊन महावितरणचे कर्मचारी रुपेश महाडिक आपले कर्तव्य बजावत आहेत.
जोरदार कोसळणाऱ्या पावसातून विद्युत प्रवाह पाण्यातून होऊन कोणती जीवितहानी होऊ नये, यासाठी हे कर्मचारी खरोखरच प्राणांची बाजी लावत आहेत. केळवली विभागात मोसम बनवाडी येथे जीवावर उदार होत महावितरणचे कर्मचारी काम करत आहेत.