महाराष्ट्र

शब्द पाळला; रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरेला शिवसेनेने दिले हक्काचे घर

Published by : Lokshahi News

रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरेला शिवसेनेने हक्काचे घर दिले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रुणालीला नवीन घराची चावी दिली. यावेळी रुणालीचे सर्व कुटुंब उपस्थित होते.

14 ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेनमध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासोबतच शिवसेनेच्या वतीने तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

मूळच्या मानपाडा येथे राहणाऱ्या रुणालीकडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज शिंदे यांच्या निवासस्थानी रुणाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे आता शिवसेनेने तिला हक्काच घरकुल देऊन तिच्यासमोरील निवाऱ्याचा प्रश्नही निकाली काढला आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी