पुण्यात सुरू असलेल्या किडनी रॅकेटचा (Pune kidney racket) पर्दाफाश लोकशाही न्यूजने केला होता.या प्रकरणात सुरू असलेले किडनी रॅकेट (Pune kidney racket) लोकशाही न्यूजने समोर नागरीकांसमोर आणत प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले होते. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून आता रूबी हॉल क्लिनिकची (Ruby Hall Clinic) मानवी अवयव प्रत्यारोपण केंद्राची मान्यता रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेची किडनी तस्करी (Pune kidney racket) रूबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) करण्यात आली होती. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचं आमिष दाखवून रविभाऊ नामक किडनी तस्करांनी ही तस्करी केली होती. या प्रकरणात लोकशाही न्यूजने सर्वप्रथम तस्करीची बातमी दाखवत प्रशासनाला सवाल केले होते. या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा लोकशाही न्यूज करुन प्रशासनावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला होता.
लोकशाही न्यूजच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिक मधील किडनी तस्करी प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकची मानवी अवयव प्रत्यारोपण केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.