महाराष्ट्रात येणार्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य आहे. राज्य सरकारच्या 'ब्रेक द चैन' मोहिमेनुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीस आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेला असेल.
दि. १८ एप्रिल २०२१ आणि १ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेली सर्व निर्बंधे देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्या प्रत्येकाला लागू असतील.लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना तपासण्याचे तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -१९ योग्य वर्तन अनुसरण करण्याचे पुन्हा सांगण्यात येत आहे.