महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीवर रोहित पवार यांचं ट्विट; म्हणाले...

राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुहूर्त ठरला

Published by : Siddhi Naringrekar

राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुहूर्त ठरला असून आज 7 आमदारांचा शपथविधी होणार आहे. भाजप 3, राष्ट्रवादी 2, सेनेकडून 2 नावं दिल्याची माहिती मिळत आहे. राजभवनात दुपारी 3 वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम होणार असून सरकारने पाठवलेल्या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ, संजय खोडके यासोबतच शिवसेनेकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे यांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने शेवटच्या दिवशी सुद्धा घटनेला तडे देण्याचे प्रयत्न सोडलेले नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील शेवटच्या दिवशी आमदार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, #KGF च्या गरुडा- अधिराप्रमाणे सर्व नियम कायदे बाजूला सारून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागणाऱ्या या संविधनविरोधी सरकारचा अंत केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. असो सरकारला सत्तेतून महाराष्ट्र हद्दपार करेल याची शाश्वती आली असावी आणि या भीतीतूनच आमदार नियुक्तीचा निर्णय घेतला असेल. असे रोहित पवार म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती