रोहित पवार यांनी मतदारसंघातील सिद्धटेकमधील भिमा नदीवरील पुलाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, हा व्हिडिओ माझ्या मतदारसंघात सिद्धटेकमधील भीमा नदीवरच्या पुलाची आजची स्थिती सांगणारा आहे.
उजनी धरणात मोठ्या प्रमाणात येवा येत असल्याने परिस्थिती गंभीर बनण्यापूर्वीच पाणलोट क्षेत्रातील आणि धरणाखालील नदी काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आणि उजनीतील सध्याचा २० हजार क्युसेक हा विसर्ग वाढवण्याची गरज आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क झाला असून लोक संकटात येण्यापूर्वी शासनाने तातडीने दक्षता घ्यावी आणि लोकांच्या घरात पाणी शिरण्यापूर्वी त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची योग्य ती सोय करावी, ही विनंती. असे रोहित पवार म्हणाले.