राज्यात पुन्हा कंत्राटी भरती होणार असल्याची माहिती मिळत आहे. शासकीय वैदकीय महाविद्यालयात 6 हजार 830 पदांसाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने पद भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, इकडे सरकारी नोकरीच्या आशेने आमच्या विद्यार्थ्यांनी रात्रं-दिवस अभ्यास करायचा आणि तुम्ही तिकडे तुमच्या सहकाऱ्यांच्या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून कंत्राटी भरती सुरू करायची.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कंत्राटी भरतीच्या माध्यमातून प्रायव्हेट कंपन्यांचे खिसे भरून लाड करण्यासाठी राज्यातल्या लाखो युवकांचे भविष्य दावणीला बांधण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला? कंत्राटी भरती करून राज्यातील लाखो युवांचे नुकसान करू नका #कंत्राटी_भरतीचा विचार करत असाल तर सरकारला महाग पडेल. असे रोहित पवार म्हणाले.