महाराष्ट्र

Rohit Pawar : पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने UPSCच्या पारदर्शकतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं

पूजा खेडकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पूजा खेडकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने #UPSC च्या पारदर्शकतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं… असं होत असेल तर #UPSC कडून दरवर्षी निवड झालेल्यांमध्ये उघड न झालेल्या अनेक #पूजा_खेडकर का असणार नाहीत?

मला वाटतं यानिमित्ताने बोगस भरती शोधून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. तरच पात्र आणि खऱ्या गुणवंतांना न्याय मिळेल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, नाहीतरी वाळवी लागलेली संपूर्ण सिस्टीम आज सर्वसामान्य माणसालाच पोखरत असल्याचं दुर्दैवाने बघत बसावं लागत आहे. त्यामुळं व्यवस्थेला लागलेली ही कीड कायमची दूर करण्यासाठी आतातरी सरकार पुढाकार घेणारा का? असे रोहित पवार म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी