सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेवर रुपाली चाकणकरांना रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, मी रुपालीताई चाकणकरांना आठवण करुन देऊ इच्छिते की, ज्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती त्या टीका करत आहेत.
त्या सुप्रियाताई सुळेंमुळेच त्यांचं अस्तित्व आहे. कारण त्यांनी जर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद असेल किंवा महिला आयोगाचे अध्यक्षपद दिलं नसतं तर त्यांची ओळखही तयार त्या स्वत: करु शकल्या नसत्या. पण आमच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे या आमचे सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या समर्थ आहेत त्या नेत्या आहेत आमच्या.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, तुम्हाला आमदारकीचे डोहाळे लागल्यासारखे आम्हाला दिसतंय. पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई. त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल. ज्या नेत्यांनी तळागाळातल्या गोरगरिब लोकांचे प्रश्न मांडलेत. यांच्यावरती बोलणं म्हणजे आकाशामध्ये थुंकण्यासारखं आहे. ते सर्व तुमच्यावरतीच परत येणार आहे. त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका. पहिले नगरसेवक कसं होता येईल याकडे लक्ष द्या. असे रोहिणी खडसे म्हणाल्या.