Crime Team Lokshahi
महाराष्ट्र

Robbery : गोळीबार करत बँका ऑफ महाराष्ट्राचे एटीएम नेले पळवून

सीसीटीव्हीला फासला काळा रंग

Published by : Team Lokshahi

सांगली |संजय देसाई

सांगली जिल्ह्यातील (Sangali) कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या (Bank Of Maharashtra)शिरढोण येथील एटीएमवर दरोडा (Robbery)पडला आहे. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी रोकड असलेली एटीएम मशीन (ATM)पळवली आहे. या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील खळबळ उडाली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या पंढरपूर महामार्गावरील शिरढोण या ठिकाणी एटीएम सेंटरवर दरोडा पडला. गावातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरवर हा दरोडा पडला आहे. अज्ञात दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मशीन थेट पळवून नेले आहे. दरोडेखोरांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून पहिल्यांदा सेंटरमधील सीसीटीव्हीवर काळा रंग फासला आणि त्यानंतर दोन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या दरोडेखोरांनी पैशांनी भरलेले एटीएम मशीन थेट दोरीच्या साह्याने गाडीला बांधले.

एटीएम बाहेर ओढत असतांना आजूबाजूच्या नागरिकांना जाग आली त्यानंतर या नागरिकांनी या दरोडेखोरांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांच्याकडून हवेत गोळीबार करण्यात आला. त्यानंतर बाहेर काढण्यात आलेल्या एटीएम मशीन गाडीमध्ये घालून पोबारा केला. चार ते पाच दरोडेखोरांच्याकडून हा दरोडा टाकण्यात आल्याची बाबसमोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस पथकासह पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने दरोड्याचा तपास सुरू केला आहे. जिल्ह्यामध्ये यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शोधासाठी विशेष पथकेही तैनात करून रवाना करण्यात आली आहेत.पण या एटीएम मशीनमध्ये नेमकी किती रक्कम चोरीला गेली, हे समजू शकले नाही.याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Crossfire with Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांची विशेष मुलाखत

Latest Marathi News Updates live: भाजपचा जाहीरनामा प्रकाशित

भाजप कार्यालयात आढळला रक्ताने माखलेला कार्यकर्त्याचा मृतदेह, महिलेला अटकेत; प्रकरण काय?

BJP Manifesto: भाजपचा जाहीरनामा प्रकाशित

Ash Gourd : कोहळा खाण्याचे आयुर्वेदिय फायदे; जाणू घ्या 'ही' खास रेसिपी