महाराष्ट्र

ED ने जप्त केलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

Published by : Lokshahi News

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गेल्या ४ वर्षांपासून तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईदरम्यान त्यांचा बंगलाही जप्त केला होता. याच बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबद्दल चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चतुःश्रुंगी मंदिराजवळ डीएसकेंचा ४० हजार चौरस फुट जागेत पसरलेला बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बंगला ईडीने जप्त केला होता. तसंच सील केला होता. या बंगल्याचं सील तोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला आहे. याबद्दल भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...