महाराष्ट्र

रितेश देशमुख आणि जेनेलियाने मानले महाराष्ट्र सरकारचे आभार

Published by : Lokshahi News

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात 'ईस्टर्न फ्री वे' मार्गाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली . त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जेनेलिया डिसूझा आणि रितेश यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आणि अभिनेता रितेश देशमूख हा एक बहुमान आहे असे म्हणतं महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे. दोघांनीही या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांच्या मुळेच हा मार्ग तयार होऊ शकला. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गेल्या वर्षी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

दिवाळीत उटणे लावण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता