महाराष्ट्र

मिठी नदी सफाई कामाचा महापौरांनी घेतला आढावा

Published by : Lokshahi News

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिल्ट पुशींग पन्टुन मशीनची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी करून मिठी नदी सफाई कामाचा आढावा घेतला आहे. मुंबईतील मिठी नदीच्या गाळ काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. हा गाळ काढण्यासाठी महानगरपालिकेकडून अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. या कामाचा महापौरांनी आढावा घेतला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमटीएनएल कार्यालयालगतच्या मिठी नदीत येणारी माती, घाण, कचरा आणि गाळ ईत्यादी वाहून येऊन ते मिठी नदीच्या पातमुखामध्ये, तसेच मिठी नदीत जमा होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न होता गाळ साचून राहतो. गाळ न काढल्यास सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे मध्य रेल्वे सुध्दा विस्कळीत होते.पावसाळा सुरु होण्यापूर्वी आणि त्यानंतर मिठी नदीचा प्रवाह सुरळीत ठेवण्याकरीता मिठी नदी तसेच संबधीत पातमुखामधील गाळ काढणे आवश्यक आहे. हा गाळ काढण्यासाठी बृहन्मुंबई महाननगरपालिकेतर्फे मिठी नदीचे गाळ काढण्याचे काम अत्याधुनिक यंत्रसामुग्री जसे सिल्ट पुशींग पन्टुन मशीन (Silt pushing Pontoon Machine), मल्टिपर्पज अम्फिबियस पन्टुन मशीन (Multipurpose Amphibious Pontoon Machine) यासोबत पोक्लेन मशीन याद्वारे गाळ काढला जातो. यासर्व घटनेचा आढावा किशोरी पेडणेकर यांनी घेतला.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव