इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालाय. मुंबई आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची खबर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली . यानंतर बंगल्यावर छापा मारला असता मादक द्रव्यासह बिभत्स अवस्थेत आढळून आले.
या रेव्ह पार्टी प्रकरणीत १० पुरुष आणि १२ महिलाचा समावेश असून यातील ४ महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व १ महिला बिग बॉस या शोमध्ये काम केले असल्याचे समजते. घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी ही कारवाई केल्याचे समजते.