केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहे. पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या अबकारी करात 5 रु तर डिझेलच्या अबकारी करात केंद्राकडून 10 रुपयांची सूट देण्यात आली आहे. उद्यापासून सूट लागू होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारचा दिलाशाचा प्रयत्न आहे.