महाराष्ट्र

Eknath Shinde : शिवसेनेला अजून मोठे खिंडार, बंडखोरांची समजूत काढणारे रवींद्र फाटकही फुटले!

Published by : Shweta Chavan-Zagade

विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. या राजकीय भूकंपानंतर उध्दग ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देताच आपले शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडले आणि आपला मुक्काम मातोश्रीवर हलवला. याचदरम्यान बंडखोरांची समजूत काढण्यासाठी गेले रवींद्र फाटकही गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे. फाटकांसोबत संजय राठोड व दादा भुसे हे आमदारही हॉटेलमध्ये पोहचले आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत काही अपक्ष आमदार देखील आपल्यासोबत असून आणखी काही जण सहभागी होण्यार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे नक्की काय होणार ठाकरे सरकार पडणार की काय अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत.

अशातच आता संजय राठोड आणि दादा भुसे यांच्यासोबत रवींद्र फाटकही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना समजवायला सुरतला गेले होते. जर रवींद्र फाटक, संजय राठोड आणि दादा भुसे गेल्यानंतर शिंदे गटात 40 आमदारांची शक्यता आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या गटात फक्त 15 आमदार उरणार आहेत. शिंदे गटामध्ये 5 मित्र पक्ष असल्याची माहिती मिळत आहे.

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latur : लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज लातूर बंदची हाक

Bharat Gogawale : आमदार भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट | Marathi News

Sangli : सांगली जिल्ह्यात पावसाचे थैमान; पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर

Navra Maza Navsacha 2 : "नवरा माझा नवसाचा २"ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद