महाराष्ट्र

शेतकरी नेते रविकांत तुपकर शरद पवारांच्या भेटीला; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल होत त्यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देत रविकांत तुपकर म्हणाले की, स्वतंत्रपणे चळवळीची वाटचाल करणारे लोक आहोत. आम्ही काही कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जात नाही आहोत.

स्वतंत्रपणे चळवळीची वाटचाल करताना राजकीय भूमिका घेताना आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ अशी लोकांची भावना आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या भेटीगाठी आणि चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत

उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सांगितले की, आम्ही काय फरफटत कुणाच्या मागे येणार नाही. सन्मानाने सोबत तुम्ही घेत असाल तर आम्ही येऊ. नाही तर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. असे रविकांत तुपकर म्हणाले.

Maharashtra Election: कधी आहे निवडणूक? कधी लागणार निकाल?

Kojagari Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला खेळला जाणारा भोंडला नेमका आहे तरी काय? जाणून घ्या...

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ; नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या