मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत मोठी भूमिका मांडली होती. तसेच राज्य सरकारला भोंगे उतरवण्याबाबत अल्टीमेटम दिला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच रंगले आहे. त्यातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांवर (sharad pawar) आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray) टीका केल्याने आता राष्ट्रवादी (ncp) आणि शिवसेनेनेही (shivsena) आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या गदारोळातच आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) शेरोशायरी करत भाष्य केलं आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज (३ मे ) ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला. “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”, असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.
१ मे रोजी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनीही सभा घेतल्या. या सभांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता. तर राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली. त्यामुळे या दोघांनीही विषय वाटून घेतल्याची टीका राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून होत होती. तसंच शरद पवारांच्या बदनामीसाठी राज ठाकरेंनी टीका केल्याचंही दोन्ही पक्ष वारंवार सांगत होते. याच अनुषंगाने संजय राऊतांच्या या ट्विटचा संदर्भ लावला जात आहे.