महाराष्ट्र

रत्नागिरीत 24 तासात 151 नवे कोरोना बाधित; 15 मृत्यूची नोंद

Published by : Lokshahi News

मागील 24 तासात 151 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 15  रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 151 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 71 हजार 876 इतकी झाली आहे.

नव्याने सापडलेल्या 151 पैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी 86 तर अँटीजेन चाचणी केलेल्यांपैकी 65 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजार 876 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 67 हजार 470 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.  24 तासात 158 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 

जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये 1 हजार 51 जण उपचार घेत आहेत. कोरोना कोविड सेंटरमध्ये 652 मध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.नव्याने 15 मृत्यू झाल्याने मृत्युदर 2.92 टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर मागील आठवड्यात 2.32 टक्के इतका होता. जिल्ह्यत लक्षण नसलेले 1 हजार 714 तर लक्षण असलेले 425 रुग्ण उपचार घेत आहेत. 

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण