जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटत असले तरी शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 28 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या 28 मृत्यूपैकी 25 मृत्यू यापूर्वीचे तर 3 मृत्यू 24 तासातील आहेत.
जिल्ह्यात नव्याने 218 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 218 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 71 हजार 267 इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या 218 पैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी 118 तर अँटीजेन चाचणी केलेल्यांपैकी 100 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजार 267 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 67 हजार 7 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 24 तासात 192 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार 28 मृत्यूची नोंद करण्यात आली असून यातील 25 मृत्यू यापूर्वीचे आहेत. जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये 1 हजार 22 जण उपचार घेत आहेत. कोरोना कोविड सेंटरमध्ये 522 मध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 2.89 टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर मागील आठवड्यात 2.82 टक्के इतका होता.