महाराष्ट्र

राबडीदेवी-रश्मी ठाकरे तुलनेने बिहारमध्ये संताप

Published by : Lokshahi News

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांचा उल्लेख मराठी राबडी देवी (rabri devi) केल्याने भाजप नेते (bjp leader) जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांचा फोटो ट्विट (tweet) करून मराठीत राबडी देवी असा उल्लेख केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या (mumbai police) सायबर शाखेने (cyber crime) त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्याचवेळी थेट बिहारमधून या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला गेला आहे.

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी यांच्याशी रश्मी ठाकरे यांची तुलना करण्यात आल्याने त्यावर तीव्र आक्षेप घेत राजद प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. 'भाजपवाल्यांनी साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ते आता आई-बहिणीलाही लक्ष्य करू लागले आहेत. हे हीन राजकारण खपवून घेतले जाऊ नये.

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने याची गंभीर दखल घेत दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी', अशी मागणीच मृत्युंजय तिवारी यांनी केली. 'राबडीदेवी यांनी यशस्वीपणे बिहारचं नेतृत्व केलं. एक महिला मुख्यमंत्री म्हणून ती अभिमानास्पद बाब आहे. भाजप पदाधिकाऱ्याने ट्वीटरवर त्यांचा अपमान केला असून एकप्रकारे हा साऱ्या महिलांचाच अपमान आहे. यातून भाजपची नेमकी मानसिकता दिसून येत असून भाजप महिलाविरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे', अशा शब्दांत तिवारी यांनी भाजपला लक्ष्य केले.

Aawaj Lokshahicha | सत्ताधारी-विरोधकांच्या भांडणात लातूरचा विकास रखडला; कोण आहे लातूरकरांचा वाली?

Narayan Rane On MVA: मविआ फक्त टाईमपास करतेय ; राणेंचा घणाघात

Bala Nandgaonkar: शिवडीतून बाळा नांदगावकर रिंगणात

Uddhav Thackeray Vaijapur: "लुटेंगे और बाटेंगे" हा भाजपचा नारा, उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाहांना टोला

Latest Marathi News Updates live: "तब्येत बरी नाही," काय म्हटले राज ठाकरे?