Crime Team Lokshahi
महाराष्ट्र

जुळे असल्याचा फायदा घेत विवाहितेवर सहा महिने बलात्कार

पतीकडूनही विवाहितेला मिळाला नाही न्याय

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. बलात्काराची वेगवेगळी आणि विचित्र प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra)वेगवेगळ्या शहरांमध्ये महिलांवर घरच्याच माणसांकडून बलात्कार (Rape Case)होत आहेत. लातूरमधून (Latur)असाच एक विचित्र प्रकार समोर आलाय.

एक महिला लग्न होऊन सासरी येते आणि सासरी आल्यानंतर तब्बल सहा महिने आपल्या पतीच्या जुळ्या भावाकडून तिच्यावर बलात्कार केला जातो.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेल्यावर्षी २० वर्षीय पीडितेचे लातूर मध्ये रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात लग्न झाले. लग्नानंतर आपल्या नवऱ्याचा एक जुळा भाऊ असल्याची माहिती तिला मिळाली. पीडितेचा पती आणि त्याचा जुळा भाऊ यांच्या दिसण्यात कमालीचे साधर्म्य असल्याचा फायदा घेऊन तब्बल सहा महिने या पतीच्या जुळ्या भावाने आपल्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवले. सहा महिन्यानंतर हा प्रकार पीडितेच्या लक्षात आला आणि या प्रकाराची माहिती तिने आपल्या पतीला आणि सासू सासऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी पीडितेला या प्रकरणाची कुठेही वाच्यता न करण्याबाबत आणि जसे चालू आहे तसे चालू ठेवण्याबाबत धमकावले आणि हा प्रकार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. पती आणि सासू सासऱ्यांच्या या भूमिकेने घाबरलेली आणि मानसिक धक्का बसलेली पीडित महिला आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी गेलेल्या आपल्या भावाच्या पत्नीला परत घेऊन येण्यासाठी पीडितेचा दीर तिच्या घरी गेला असता पीडितेने सासरी परतण्यास नकार दिला. पीडितेच्या आई वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता या मुलीने आपल्यावर ओढवलेली आपबिती आई वडिलांना सांगितली आणि हा प्रकार ऐकून पीडित मुलीच्या आई वडिलांना देखील धक्का बसला.

याप्रकरणी पीडितेने लातूरच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर लातूर पोलिसांनी पीडितेच्या पती, दीर आणि सासू सासऱ्यांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी पीडित महिलेचा नवरा आणि त्याचा जुळा भाऊ यांना या प्रकरणात अटक केली असून. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलकांते करीत असल्याची लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी दिली आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा