महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार- संदीपान भुमरे

भाजप, शिवसेना, रिपाई, मनसे, रासप, रयत क्रांती व इतर मित्रपक्षाच्या महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज पैठण येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

Published by : shweta walge

सुरेश वायभट/पैठण; जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पैठण विधानसभा मतदार संघातील जनता भरभरून मतदान करेल, सर्वात जास्त मताधिक्य पैठण लोकसभेतून असेल असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान पाटील भुमरे यांनी व्यक्त केले केले.

भाजप, शिवसेना, रिपाई, मनसे, रासप, रयत क्रांती व इतर मित्रपक्षाच्या महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज पैठण येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महायुतीचे उमेदवार आणि भारत सरकारचे रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विलास सांदीपानजी भुमरे सुहास शिरसाठ, रमेशजी पवार, कैलास पाटील, दत्तात्रय म्हेत्रे, संजयजी ठोकळ, लक्ष्मणराव औटे,अण्णाभाऊ लबडे, विजयभाऊ चव्हाण, जगन्नाथ साळवे,गोरक्ष मोरे, दत्तात्रय नेमाने,माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, डॉ.सुनिल शिंदे, कल्याण गायकवाड, रेखा कुलकर्णी, गणेश फुके, ॲड विजय औताडे, बाप्पा शेळके यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...