जालन्यात पुन्हा खोतकर-दानवे वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही जालन्याला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचं आज शिवसेनेनं उद्घाटन न करताच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
लोकसभा निवडणुकी दानवे विरुद्ध खोतकर वाद पेटला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीने खोतकरांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्याच कालावधीत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या लोखंडी पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं.
मात्र आता पुलाचं काम पूर्ण होऊन तीन महिने उलटले. तरीही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. त्यामुळं आज युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीनं या पुलाचे बॅरिकेट्स हटवून लोकार्पण करण्यात आलंय. मात्र यामुळे आता खोतकर- दानवे वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.