मनसेचे नेते आणि खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर दोन महिने उलटूनही नगरविकास खात्याने कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच नगरविकास खात्याने वैभव खेडेकर यांच्यावर कारवाई केली नाही तर मी सरकारविरोधात न्यायलयात जाईन, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील कलहामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. वैभव खेडेकर यांच्यावर दोन महिने उलटूनही नगरविकास खात्याने कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा भ्रष्टचाारी माणसाला पाठिशी का घातले जात आहे? तो सरकारचा जावई आहे का?, असा थेट सवाल रामदास कदम यांनी विचारला. तसेच नगरविकास खात्याने वैभव खेडेकर यांच्यावर कारवाई केली नाही तर मी सरकारविरोधात न्यायलयात जाईन, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.