महाराष्ट्र

कथित ऑडिओ क्लिप प्रकरण; समाज माध्यमांवर येणाऱ्या क्लिपमध्ये तथ्य -वैभव खेडेकर

Published by : Lokshahi News

शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनिल परब अडचणीत असताना आता एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मटेरियल पुरविल्याचा दावा केला जातोय. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणात समाजमाध्यमांवर येणाऱ्या क्लिपमध्ये तथ्य असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिलीय.

वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळवली. तसेच नंतर ती किरीट सोमय्या यांना पुरवली गेली असा गंभीर आरोप केलाय. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. "अनिल परब आणि हे प्रकरण समाज माध्यमांवर यापूर्वीच आलेलं आहे. आता या संदर्भातील संभाषण ते माझं नसल्याचं म्हणत असतील. तर त्याबाबत फॉरेन्सिक तपास करावा.

दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रसाद कर्वे नामक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या ऑडिओ क्लीप चोरीला गेल्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यामुळे प्रसाद कर्वे यांनी त्यांच्या नेमक्या कोणत्या ऑडिओ क्लीप चोरीला गेल्या आहेत याची माहिती द्यावी.

किरीट सोमय्या कोकणात येऊन उद्योजकांवर माहितीचा अधिकार टाकतात, सर्व माहिती मिळवतात. त्यांना स्थानिकांची साथ असल्याशिवाय ते एवढी मोठी डेअरिंग करुच शकत नाहीत. म्हणून मला म्हणायचंय शिवसेना आणि भाजपमध्ये सख्य नाहीय. त्यामुळे या ज्या क्लिप समाजमाध्यमांवर येत आहेत त्यांच्यात काहितरी तथ्य आहे, असे वैभव खेडेकर म्हणाले आहेत.

अनिल परबांवरील कारवाई वरून रामदास भाई खुष झालेले दिसतात. या ईडीच्या कारवाई दरम्यान रामदास कदम कधी बचावासाठी उतरले नाही, पत्रकार परिषद घेऊन वाचवले नाही आहे. यांच्या मतदार संघात किरीट सोमय्या येतात त्यांना कधी त्यांनी अडवले नाही आहे. काळे झेंडे दाखवले नाही. हसन मुश्रीफांविरोधात जेव्हा कोल्हापूरात किरीट सोमय्या गेले त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.

आपल्याच पक्षाचा माणूस आपल्याच मंत्र्याच्या माणसाची अशा पद्धतीने माहिती काढून किरीट सोमय्यांना माहिती पुरवतो, हे बरोबर नाही. हे कोण करतंय, कोण नाही करत ते आमच्या विधानसभा क्षेत्रात, कोकणात सगळ्यांना माहिती आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. रामदास कदम नाकारत असतील तरी जे खरंय ते समोर आलेलं नाही. त्यांनी माहितीचे अधिकार जे टाकले आहेत ते सुद्धा प्रसाद कर्वे यांनीच टाकले आहेत. माझ्याकडे कागदपत्रे आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिलीय.

ऑडिओ क्लिपमध्ये काय ?
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अनिल परब यांच्या बांद्रेमधील कार्यालय तोडण्याविषयी संभाषण आहे…आणि याबद्दल शिवसेना नेते रामदास कदम व्हेरी गूड असं म्हणताहेत… एवढंच नाही तर गुन्हा दाखल झाला तर परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असंही कदम म्हणताहेत…. ही कथित ऑडिओ क्लिपजशी आहे तशी लोकशाही दाखवत आहे… या ऑडिओ क्लिपला लोकशाही पुष्टी करत नाही….

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती