शिवजयंती आणि राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने आनंदाचा शिधाचं वाटप केला जाणार आहे. अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत हा आनंदाचा शिध्याचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 कोटी 68 लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
आनंदाचा शिध्यात शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तू मिळणार आहेत. हा शिधा प्रत्येकी १०० रुपये या सवलतीच्या दरात वितरित होणार आहे.