पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण करण्यात आले आहे. भगवान श्रीराम यांच्यावर जगभरात प्रसिद्ध झालेल्या तिकिटांशी संबंधित एका पुस्तकाचेही अनावरण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अयोध्येतील राम मंदिरावरील स्मारक टपाल तिकिटासह प्रभू श्रीरामचंद्रांवर जगभरातील देशांनी प्रसिद्ध केलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राम मंदिरावरी टपाल तिकीट आणि हे पुस्तक अनेक भावी पिढ्यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आठवण करून देत राहील. ही तिकिटे केवळ कागदाचा तुकड नव्हेत. हे इतिहास ग्रंथ, कलाकृती आणि ऐतिहासिक स्थळांचे सर्वात लघुस्वरूप आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.