राज्यसभा खासदार म्हणून मुदत संपल्यानंतर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज (12 मे) जाहीर केली. या पत्रकार परिषदेदरम्यान आज संभाजीराजे यांनी आपली पुढील भूमिका जाहीर केली असून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तसेच लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे.
पंतप्रधानांचे मानले आभार -
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून विनंती केली की, राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. म्हणून मी ते पद स्विकारलं. मी राष्ट्रपती महादोय, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यावेळी मी त्यांना शाहू महाराजांचं पुस्तक दिलं होतं. मी छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालणार आहे, असं त्या पुस्तकावर मी लिहिलं होतं.
या सहा वर्षात अनेक कामं केली. व्यापक दृष्टीकोणातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोणी साजरी केली असेल तर मी सुरू केली. शिवाराज्यभिषेक सोहळा अधिक व्यापक केला. संसदेत शाहू महाराज आणि छत्रपतींच्या विचारावर बोललो. माझ्यामुळे राष्ट्रपती रायगडावर आले, असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले. माझ्या कामामुळे माझ्यावर विश्वास ठेवावा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मला साथ द्यावी, असं आवाहन देखील छत्रपती संभाजी राजेंनी यावेळी केले आहे.
राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होणार आहे. तीन जागा भाजप आणि एक जागा राष्ट्रवादी आणि एक जागा काँग्रेस असं पूर्वीचं समीकरण आहे. आता दोन जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादी आणि एक जागा काँग्रेस आणि एक शिवसेनेला जातेय. महाविकास आघाडीकडे २७ मतं, तर भाजपकडं २२ मतं आहेत.
गेल्या ५ मे रोजी आझाद मैदानात माझ्या शब्दावर बहुजन आणि मराठा समाजाने आंदोलन मागे घेतलं. मी प्रत्येकवेळी समाजाची भूमिका घेतली. आरक्षण रद्द झालं तेव्हा मी महाविकास आघाडीची भूमिका घेतली. पण, हे सर्व समाजाच्या हितासाठी केले असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.