सांगलीत नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील, तर शेतकऱ्यांचं समाधान करा, असा धमकीवजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. संपूर्ण देशाला ही केंद्र सरकारची चाल महागात पडेल, असे ते म्हणाले.
कृषी मूल्य आयोग हे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले आहेत. कृषी मूल्य आयोगाने उसाच्या एफआरपी मध्ये स्वतःची पाठ थोपटल्याचा आरोप शेट्टींनी केला.
केंद्र सरकारने कृषी तज्ञा आणावेत आठशे टनमध्ये ऊस पिकवून दाखवावा.. शेतकऱ्याची चेष्टा थांबवावी म्हणून तर आज शेतकरी गांजा पिकवायची मागणी करू लागला आहे. आज तालिबानचं उत्पन्न गांजा आहे हे विसरू नका, अशी आठवण शेट्टींनी करून दिली.
काय म्हणाले शेट्टी ?
तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असच वागणार असाल तर हा देश तालिबानच्या दिशेने जाईल याची जाणीव ठेवा. नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा. नाहीतर संपूर्ण देशाला ही केंद्र सरकारची चाल महागात पडेल..असे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.