आक्रोश मोर्चानंतर राज्य सरकारला पूरग्रस्त शेतकऱ्यांची दया आली नाही. याकडे जिल्ह्यातील मंत्र्यांनीही गांभिर्याने पाहिले नाही. त्यामुळे जलसमाधी आंदोलन हे होणार, असा निर्धार स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
1 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता तीर्थक्षेत्र प्रयाग चिखली येथून जलसमाधी प्ररिक्रमेस प्रारंभ होणार आहे. पंचगंगा काठावरुन यात्र पाच सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दत्त महाराजांचे तिर्थक्षेत्र आणि महापुराची राजधानी नृसिंवाडी येथे पोहचेल. त्यानंतर कृष्णा पंचगंगाच्या संगमावर हजारे पूरग्रस्त शेतकऱयांसमवेत जलसमाधी घेणार असल्याची माहिती शेट्टी यांनी पत्रकाराशी बोलताना दिली.