महाराष्ट्र

Maharashtra Lockdown । “…त्या दिवशी राज्यात कठोर लॉकडाउन लागू करणार ”, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५ ऑगस्टनंतर आणखीन निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. दरम्यान निर्बंध शिथिलतेची माहिती देतानाच त्यांनी ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन एका दिवसाला तिसऱ्या लाटेत लागेल तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा निर्णय झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी देखील राजेश टोपे यांनी माहिती दिली. "तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात एकूण उत्पादित होणारा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे. औद्योगिक क्षेत्राने अजून २०० ते ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवण्याची खात्री दिली आहे. त्याप्रमाणे त्यांनी वाढ देखील केली आहे. राज्यात एकूण ४५० पीएसए प्लांट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी १४१ प्लांट्समध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही सर्व क्षमता जरी वापरली, तरी १७०० ते २००० मेट्रिक टनपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार आहे. केंद्रानं सांगितलंय की दुसऱ्या लाटेचा पीक होता, त्याच्या दीडपटीची व्यवस्था करून ठेवा. त्यामुळे ३८०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे", असं राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.

तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी राज्यात ७०० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात ऑटो मोडवर कठोर लॉकडाऊन लागू करण्यात येईल. इतर राज्यात देखील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे केंद्राकडून वेळेवर किती मदत मिळू शकेल, हे सांगता येणं शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भात आपण हा निर्णय घेतला आहे", असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण